अरे बापरे! आता आला ‘मोदी आंबा’!

Photo of author

By Sandhya

आता आला ‘मोदी आंबा’!

देशात विविध प्रकारचे आंबे आहेत आणि काही नव्या प्रजातीही विकसित करण्यात आलेल्या आहेत. या नव्या प्रजातींना वेगवेगळ्या नामांकित लोकांची नावे देण्यात आली आहेत.

आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असलेला ‘मोदी आंबा’ पुढील वर्षी बाजारात दाखल होणार आहे. आंबा प्रेमींना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे हा ‘मोदी आंबा’ दसरी, लंगडा आणि चौसा पेक्षा कितीतरी पट मोठा असेल. त्याची चवही आंब्याच्या इतर सर्व प्रकारांपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल.

मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व आंब्यांपेक्षा ‘मोदी आंब्या’ची किंमत कितीतरी पटीने जास्त असेल. तसेच ‘मोदी आंबा’चे झाडही महागणार आहे.

अवध आंबा उत्पादक आणि बागायती संस्थेचे सरचिटणीस उपेंद्र कुमार सिंग यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की सेंट्रल सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूटने ‘मोदी आंबा’ वर आपला शिक्का मारला आहे.

2019 मध्ये त्यांनी आंब्याचे विविध प्रकार घेतले होते. या आंब्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना याची चव सध्याच्या सर्व आंब्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे आढळून आले. आंब्याची ही जात नवीन आहे.

त्याच्या नावाची चर्चा झाल्यावर त्यांनी ‘मोदी मँगो’ असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. आता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

पुढील वर्षी ‘मोदी आंबा’ बाजारात आणणार असल्याचे उपेंद्र सिंह यांनी सांगितले. लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल. त्याच्या लागवडीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे.

त्यातील एका झाडाची किंमत त्यांनी एक हजार रुपयांपर्यंत ठेवली आहे. इतर आंब्यांपेक्षा हा आंबा थोडा महाग असेल; पण देशाच्या कानाकोपर्‍यात जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page