Arrest Rupali Chakankar! Neelam Go-He should resign immediately! “Hang the rapist Kharat Baba”




पुणे : एस.पी. कॉलेज चौकात आज गुलाबो गॅंगच्या वतीने भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात संतापजनक व आक्रमक प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले. त्याला काळे फासले त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्याला जोड्याने मारले महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक आणि सामाजिक शोषण करणाऱ्या अशा भोंदू प्रवृत्तींचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सरकारला थेट इशारा देतो — आता कारवाई जलद गतीने झालीच पाहिजे , नाहीतर आंदोलन अधिक उग्र होईल! आम्ही महिला कोर्टात जाऊन त्या बलात्काऱ्याला भोंगळा करून मारू
या आंदोलनात स्पष्टपणे मागणी करण्यात आली की,➡️ अशोक खरात याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अतिशय क** शिक्षा व्हावी रूपाली चाकणकर यांना सहआरोपी ठरवून चौकशी करून अटक करावे. ह्या सर्व प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत नीलम गो-हे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
हे आंदोलन गुलाबो गॅंग व पायल तिवारी बिटीया फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी संगीता तिवारी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की —”महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. कायदा झोपला असेल तर आम्ही जागवू, पण न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही!”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही देवा भाऊ यांना याबाबत शंभर पोस्टकार्ड रुपी पत्र पण पाठवली आहेत देवा भाऊ न्याय द्या सुनेत्रा वहिनी न्याय द्या ही आमच्या लाडक्या बहिणींची मागणी आहे
या आंदोलनात शोभना पण्णिकर, पूजा पाटील चव्हाण, प्रिया पाटील सूर्यवंशी, सोनिया ओव्हाळ, सारिका शिंदे, भारती लोंढे, पारूल ताई, शुभा वाफारे, मालन चव्हाण सुवर्ण माने शुभांगी वखारे आदी बऱ्याच महिला कार्यकर्त्यांचा संतप्त सहभाग होता.
इशारा :जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रशासनाला त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल.