अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण; इगतपुरीत शेतपिकांचे नुकसान

Photo of author

By Sandhya

अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण; इगतपुरीत शेतपिकांचे नुकसान

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या जोरदार गारांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी आधीच सावरलेला नाही. त्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे पुनःश्च मोठे नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व बेमोसमी पावसाने शेतकर्‍यांच्या टोमॅटो, कांदे, मिरची, फ्लॉवर, कोबी, भोपळा, वांगे आदी बागायती पिकांसह गहू, जनावरांचा चारा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे झाले नाहीत. पुन्हा जोरदार पाऊस बरसल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यंदा सुरुवातीपासूनच एकाही बागायती पिकाला भाव नाही. त्यातच महागडे औषधे, खते, मजूर यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून जगवलेल्या पिकांची अवकाळी पावसाने पुरती नासाडी झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Comment