बच्चू कडूंची विनंती : ‘जरांगे जी.. मी बच्चू बोलतोय कृपया तुम्ही पाणी प्या..’ 

Photo of author

By Sandhya

‘जरांगे जी.. मी बच्चू बोलतोय कृपया तुम्ही पाणी प्या..’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत “मराठा आरक्षण द्यायला हवं’ असा सुर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून लावण्यात आला.

सरकारने जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना तातडीने आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

मात्र बुधवार रात्रीपासून जरांगे यांनी पाण्याचा त्यागही केला आहे. जो पर्यंत  मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोवर ते  उपोषण सुरूच ठेवणार आहे.

अशात आमदार बच्चू कडू यांनी काल रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन संवाद साधला. बच्चू कडू यांच्याकडे सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहे.

अशात बच्चू कडू यांनी जरांगे यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले,’जरांगे जी मी बच्चू बोलतो, कृपया तुम्ही पाणी प्या तुमची गरज आहे समाजाला.. समाजासाठी तुमच जगणं फार महत्वाचे आहे? 

पाणी पिणे बंद करू नका.. तुम्ही समजाचे सेनापती आहात..प्रकृती खालावली तर आंदोलनही हातचे जाईल आणि तुमच्या विना लढाई लढता येणार नाही पाणी प्या मी एक प्रामाणिक भावनेतून आलोय मी स्वःता तुमच्यासोबत उभा राहील तुम्हाला काही त्रास होतोय काय ?

समाजासाठी तुम्हीच एक केंद्र बिंदू आहात मी फक्त तुमच्या साठी आलोय छत्रपतींची राजनीती करा… कृपया पाणी प्या…’ असं म्हणत कडू यांनी जरांगे यांना विनंती केली.

Leave a Comment