बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दाखल

Photo of author

By Sandhya

 बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या विरोधात मुंबईतील (Mumbai News) वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचंही युवासेनेनं तक्रारीत म्हटलं आहे. 

बागेश्वर धाम सरकारविरोधात ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. 

Leave a Comment

You cannot copy content of this page