राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीच्या मातीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी रत्नागिरीतून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आडीवरे नजीक कशेळी बांध येथे आज (सोमवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये १७ पोलिस जखमी झाले.
बंदोबस्तासाठी जाणारे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला आहे. यात 17 पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम पावस आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले.