Baramati by-election 2026 is not unopposed; 23 candidates including Sunetra Pawar in fray; 30 candidates including Congress withdraw on the last day

Photo of author

By Sandhya

बारामती पोटनिवडणुक २०२६ बिनविरोध नाहीच ; पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात ; शेवटच्या दिवशी कॉंग्रेससह ३० उमेदवारांची माघार

बारामती – स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणुक होत आहे.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.यामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना पक्षाचा आदेश आल्याने आपला अर्ज माघारी घेतला आहे.त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत.बारामती पोटनिवडणुक २३ एप्रिल २०२६ रोजी होत असल्याने ही पोटनिवडणुक बिनविरोध होईल असा अंदाज होता परंतु सुनेत्रा पवारांसह २३ उमेदवार उमेदवारी अर्जावर ठाम राहिले आहेत,त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत कोणाला किती मते पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार — १) सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) २) राघु येताळा घुटुकडे (न्यु राष्ट्रीय समाज पक्ष) ३) सतीश कृष्णा कदम (हिंदुस्तान जनता पार्टी) ४) अभिजीत वामनराव बिचकुले (अपक्ष) ५) अविनाश वामनराव गायकवाड (अपक्ष) ६) करुणा धनंजय मुंडे (अपक्ष) ७) गजानन विठ्ठल गवळी (अपक्ष) ८) चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष) ९) चंद्रकांत सुर्यकांत वाघमोडे (अपक्ष) १०) दत्तात्रय रावसाहेब बेदरे (अपक्ष) ११) बाळासो मारुती धापटे (अपक्ष) १२) मिथुन सोपानराव आटोळे (अपक्ष) १३) मंगलदास निकाळजे (अपक्ष) १४) योगेश मोहनदास रतेश्वर (अपक्ष) १५) सोनाली सुर्यकांत राणे (अपक्ष) १६) रोहित राजु भोसले (अपक्ष) १७) विजयकुमार रामचंद्र भिसे (अपक्ष) १८) विराज महादेव शिंदे (अपक्ष) १९) शिवाजी जयसिंग कोकरे (अपक्ष) २०) सतीश नाना सोनवणे (अपक्ष) २१) सागर शरद भिसे (अपक्ष) २२) साजन भगवान अडसूळ (अपक्ष) २३) सिताराम विठ्ठल रणदिवे (अपक्ष)

बारामती पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घेतलेले उमेदवार — १) आकाश मोरे (कॉंग्रेस) २) गोपाल तंतरपाळे ३) दिनकर गायकवाड ४) दादा थोरात ५) सुवर्णा गायकवाड ६) अरुण निटुरे ७) खिजर पिरजादे ८) विशाल घोरपडे ९) उमेश म्हेत्रे १०) दिलीप अळोणी ११) संतोष कांबळे १२) सिद्धाराम काकणकी १३) अनिल तुपे १४) त्रिशला कांबळे १५) महेंद्र ताटे १६) उन्मेश देशमुख १७) संकेत गावडे १८) मोहन राऊत १९) संदिप खरात २०) दशरथ राऊत २१) त्रिभुवन पद्माकर २२) प्रतिक्षा चव्हाण २३) विक्रम कोकरे २४) अभिजित कांबळे २५) विलास होळकर २६) माऊली कांबळे २७) रज्जाक जाफर मुलाणी २८) राहुल थोरात २९) अमोल कोकरे ३०) अशोक खामगळ

Leave a Comment

You cannot copy content of this page