malegaon sahakari sakhar karkhana election: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या होत्या, त्या का होत्या. सहकारी संस्था शिक्षण संस्था याच्या देखील याद्या त्या ठिकाणी होत्या, असंही युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे.

बारामती: बारामती शहरातील पीडीसीसी (PDCC Bank) बँक रात्री अकरा वाजले तरी उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. बँकेची वेळ ही पाच वाजेपर्यंत असते इतक्या वेळ ही बँक (PDCC Bank) उघडी होती. त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या होत्या, त्या का होत्या. सहकारी संस्था शिक्षण संस्था याच्या देखील याद्या त्या ठिकाणी होत्या. बँकेचा (PDCC Bank) लोड वाढला असावा त्यामुळे रात्री 11 पर्यंत हे बँक उघडी असावी अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दिलेली आहे. अलीकडच्या काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय, त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झालं आहे. त्याचप्रमाणे हे राजकारण बदललं पाहिजे असे मत युगेंद्र पवारांनी व्यक्त केलं आहे. तसेच जर यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेस कारखान्याचा विकास का केला गेला नाही असा सवाल देवेंद्र पवार यांनी उपस्थित केला आहे.
इतक्या उशीरापर्यंत बॅंक का सुरू होती
काल रात्री माझ्यापर्यंत काही व्हिडीओ आले, त्यांचेही कार्यकर्ते दिसले, तिथे टेबलवर कार्यकर्त्यांना मतदारांची यादी सापडली. आम्ही ऐकत आलोय बँकेची वेळ पाच पर्यंत असते. फक्त माळेगावच्या कारखान्याची नाही तर सहकारी संस्था शिक्षण संस्था याच्या याद्या तिथे होत्या. कोणाला काय जबाबदाऱ्या दिल्या होत्या, ते देखील त्या याद्यावरती नमूद करण्यात आलेलं होतं. इतक्या उशीरापर्यंत बॅंक का सुरू होती, असा सवाल देखील युगेंद्र पवार यांनी उपस्थित केला आहे. बँकेचा लोड वाढला असावा त्यामुळे रात्री 11 पर्यंत हे बँक उघडी असावी अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिलेली आहे. अलीकडच्या काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय, त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झालं आहे. त्याचप्रमाणे हे राजकारण बदललं पाहिजे असे मत युगेंद्र पवारांनी व्यक्त केलं आहे.
नेमकं काय प्रकरण?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली होती याबाबत सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले होते. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबतचा जाब या ठिकाणी विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्याठिकाणी होते, असा दावा रंजन तावरेंनी केला आहे. पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे.