बंगळुरूच्या कल्याण नगरमध्ये एका व्यक्तीने कारच्या छतावर तीन लहान कुत्र्यांना कोणत्याही सुरक्षेशिवाय बसवून गाडी चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप निर्माण केला आहे.
व्हिडिओत कुत्रे छताला धरून बसलेले दिसत असून, यामुळे प्राण्यांना आणि इतरांना धोका निर्माण झाला आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला, त्याने चालकाला जाब विचारला असता, त्याने आक्रमक उत्तर दिले.
“हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून, यापूर्वीही त्याने असे बेजबाबदार कृत्य केले आहे,” असे कर्नाटक पोर्टफोलिओ हँडलने म्हटले.
प्राण्यांवर क्रूरता व वाहतूक नियमांचा भंग झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओत गाडीवर “प्रेस” व “HARI LIKES RISK” असे स्टिकरही दिसले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
सौजन्य : ट्विटर
http://surl.li/ibegxi