बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालकानी पगार वाढीच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. गुरुवारी नऊ डेपोतील वाहतूक बंद होती.
त्याची व्याप्ती वाढून आज (शुक्रवार) जवळजवळ सर्वच डेपोतील भाडे तत्वावर बस पूरवीणाऱ्या पाच कंपण्याच्या कंत्राटी चालकानी काम बंद आंदोलन केले. यामुळे पहाटे पासून एकही बस बाहेर पडली नसल्याने प्रवाशाचे हाल झाले.
बेस्टच्या ताफ्यात एकुण ३ हजार ८२ बस आहे. त्यापैकी १ हजार ६४२ बस पाच कंत्राटदाराद्वारे भाडेतत्वावरील आहेत. बेस्टच्या २७ डेपोमधून भाडेतत्वावरील बस धावतात.
कंत्राटदारांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आणि ईतर आर्थिक सुविधा पुरविण्यात येत नसल्याने वारंवार हे कर्मचारी कामबंद आंदोलन करतात.
बुधवारी पहाटे पासून घाटकोपर, मुलुंड या दोन डेपोतील डागा कंत्राटदाराच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले होते. गुरुवारी तब्बल नऊ डेपोतील वाहतून बंद होती.
शुक्रवारी पहाटे पासून सर्वच डेपोतील वाहतूक ठप्प झाली. यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकराचे हाल झाले. बेस्टच्या ताफ्यात एकुण ३ हजार ८२ बस आहेत.
त्यापैकी १ हजार ६४२ बस पाच कंत्राटदाराद्वारे भाडेतत्वावरील आहेत. बेस्टच्या २७ डेपोमधून भाडेतत्वावरील बस धावतात. कंत्राटदारांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आणि ईतर आर्थिक सुविधा पुरविण्यात येत नसल्याने वारंवार हे कर्मचारी कामबंद आंदोलन करतात.
बुधवारी पहाटे पासून घाटकोपर,मुलुंड या दोन डेपोतील डागा कंत्राटदाराच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे पहाटेपासून घाटकोपर आणि मुलुंड डेपोतील बेस्टचे वेळापत्रक कोलमडले.