भाजपला धक्का; बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला

Photo of author

By Sandhya

भाजपला धक्का; बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला

राज्यात काल झालेल्या बाजर समितीच्या निवडणुकीमध्ये वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. जिल्ह्यातील वर्धा, सेलू आणि देवळी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

तर भाजपचा पराभव झाला आहे. सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वातील आघाडीने बाजी मारली. वर्धा बाजार समितीत 18 पैकी 10 जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर सेलू बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

आष्टी बाजार समितीमध्ये देखील महाविकास आघाडीचाच विजय झाला आहे. आष्टीमध्ये 15 जागा महाविकास आघाडीला तर तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत.

देवळीत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आलेत. अठरा पैकी सोळा जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे, तर दोन ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

वर्धा, सेलू, आष्टी आणि देवळी अशा चारही जागेवर भाजप पूर्ण ताकतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र चारही बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Leave a Comment