काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या एका वक्तव्यावरून सध्या देशात गोंधळ निरमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी ‘भाजपला मतदान करणाऱ्यांना राक्षस म्हटलं आहे. जो भाजपला मतदान करतो तो राक्षसी प्रवृत्तीचा असतो.
मी महाभारताच्या या भूमीवरुन त्याला शाप देतो”, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने हरियाणातील उदय सिंह किल्ल्यावर जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप नेते संबित पात्रा यांनी सुरजेवाला आणि काँग्रेस पक्षावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्ष आता लोकांना शिव्या देखील देऊ लागला आहे. संबित पात्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत, “वारंवार राजकुमाराला लॉन्च करणारा काँग्रेस पक्ष आता जनतेला शिव्या देऊ लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या द्वेषाने आंधळे झालेले काँग्रेस नेते सुरजेवाला काय म्हणताहेत पाहा, भाजपला मत किंवा पाठींबा देणारी देशाची जनता राक्षस आहे,” असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
एकीकडे १४० कोटी लोकांचे प्रधानसेवक मोदी आहेत. ज्यांच्यासाठी जनताच देवाच्या रुपात आहे आणि दुसरीकडे काँग्रेसला जनता राक्षस वाटते. लोक अशा लोकांना चांगले ओळखते. त्यामुळे येत्या काळात जनताच यांच्या द्वेषाच्या दुकानावर कुलूप लावेल, अशी टीका संबित पात्रा यांनी केली.
दरम्यान, कार्यक्रमात सुरजेवाला म्हणाले की, ‘मनोहरलाल खट्टर आणि दुष्यंत चौटाला बाजारात लोकांचे भविष्य विकत आहेत. नोकरी नाही नोकरीच्या संधी तरी द्या. भाजपच्या राक्षसांनो तुम्ही राक्षस आहात.
जो भाजपला मतदान करतो आणि त्यांचे समर्थन करतो तो राक्षस आहे.’ भाजपचे नेते शहजाद पुनावाला यांनीही सुरजेवाल यांच्यावर टीका केली.
काँग्रेस नेता सुरजेवाला अफजल गुरु जी आणि ओसामा जी म्हणत असतात, आज त्यांनी जनतेला राक्षस म्हटलं.काँग्रेस भारत मातेची हत्या आणि लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हणते. सुरजेवाला लोकांना राक्षस म्हणत त्यांना शाप देत आहेत. निवडणुकीत लोक यांना धडा शिकवतील.