भाजपाचा १५२ जागा जिंकण्याचा निर्धार; बावनकुळे यांची घोषणा

Photo of author

By Sandhya

१५२ जागा जिंकण्याचा निर्धार; बावनकुळे यांची घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागा आणि विधानसभेच्या विक्रमी १५२ जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महायुतीचे २०० पेक्षा अधिक जिंकण्याची रणनीती आखल्याचे भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.१३)  भिवंडी येथे सांगितले.

भाजप प्रदेश प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडे भरपूर जागा असून काँग्रेसच्या आमदारांनाही भाजपची दारे उघडी आहेत.

राज्यातील भाजपचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांचे  एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर भिवंडीत आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराला राज्यातील ५६० पदाधिकारी उपस्थित असून ते भाजपच्या महाविजय २०२४ चे मिशन अंतर्गत कामाला लागले आहेत. राज्यातील १ लाख बुथवर कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

२८८ विस्तारक बाहेर पडतील आणि भाजपा १५२ जागा जिंकेल. महायुती म्हणून २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याकरिता येतील त्यांच्या गळयात भाजपचा दुपट्टा टाकला जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Leave a Comment