राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या संघटनात्मक फेरबदलविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, ”या बदलावर बोलणे उचित नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी या कामाला भाकरी फिरवली असं म्हणत नाहीत याला धूळफेक म्हणतात,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर जिल्ह्यात आज दिवसभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘सरकार आपल्या दारी’ योजने अंतर्गत तालुकानिहाय बैठका घेत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यांनी शिंदे गट शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
गेले दोन टर्म हा मतदारसंघ शिवसेनेकडे अर्थात विद्यमान खा. कृपाल तुमाने यांच्याकडे आहे. हॅट्ट्रिक कुणीही साधू शकलेले नाही. दुसरीकडे भाजपचा सातत्याने या मतदारसंघावर डोळा आहे. रामटेक, मौदा, पारशिवनीत उपमुख्यमंत्री आज दौऱ्याच्या निमित्ताने आले.
प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात आली असून तिथल्या लोकांच्या समस्याची माहिती ही घेण्यात आली. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मान्य केले की काही तालुक्यात कामे ही दिरंगाईने सुरू आहेत अश्या कर्मचाऱ्यांना तंबी देण्याबाबत ही जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आ आशिष जैस्वाल आदी उपस्थित होते.