पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराकडून भारताविरुद्धच्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना लगाम घालण्याचा आदेश दिला होता, असा सनसनाटी दावा पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी रात्री उशिरा ट्विटद्वारे केला.
म्हणजेच पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करतो, यावर खुद्द इम्रान यांनी प्रथमच शिक्कामोर्तब केले असून, भारतातील दहशतवादी कारवायांत सहभागाची प्रथमच कबुली दिली आहे.
या खळबळजनक दाव्यामुळे भारतीय उपखंडात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गट यांचे संबंध उघड झाले आहेत.
भारताविरुद्धच्या दहशतवादाला प्रायोजित करण्यात पाकिस्तानी लष्कराची भूमिका इम्रान खान यांनी खुलेआम मान्य केली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू भक्कम झाली असून, पाकिस्तान कशाप्रकारे जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे, हेही स्पष्ट झाले आहे.