आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जबर झटका बसल्याचे मानले जाते.
ठाकरे गटाकडून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचा टीझरही रिलीजही करण्यात आला आहे. पण मुंबई पोलिसांनी परवानगीच नाकारल्याने ठाकरेंची मोठी गोची झाली आहे. याप्रकरणी पक्षाचे एक शिष्टमंडळ लवकरच मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे.
मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरू आहे. या प्रकरणात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण हे अडचणीत आले आहेत.
तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीयदेखील अडचणीत आले आहेत. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत “मुंबईला कुणी मायबाप राहिलेले नाही.
सध्या लुटारूंच राज्य सुरू आहे,’ अशी टीका करत मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. विशेष म्हणजे युवा नेते आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेर्तृत्व करणार होते.
जसा मविआचा मोर्चा झाला तशा मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली होती. “केवळ रुटवरून चर्चा करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली नाही, तर केवळ रुट संदर्भात आम्ही भेट घेतली,’ असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.