Bhimashankar Sabha Mandapa will be listed in ‘Guinness’





जिल्हाधिकाऱ्यांची माहिती: पारंपरिक तंत्रज्ञानाद्वारे दगडांत केवळ चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे ठेवले आहे उद्दिष्ट
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्वभूमीवर भीमाशंकर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत असून, सुमारे पावणे तीन हजार चौरस फुटांच्या सभा मंडपाचे काम केवळ चार महिन्यांत पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येणार आहे.
देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे जीर्णद्वाराचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येत असून, दगडातील है बांधकाम गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारीही याला अनुकूल असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र
डूडी यांनी सांगितले. पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. यासाठी २८८ कोटी १७ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. तर केवळ सभामंडपासाठी १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सभामंडपाची पुनर्बाधणी हा
भीमाशंकर मंदिराच्या कामाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होणे केवळ पुण्याल्याच नव्हे, तर राज्याच्या च देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. ही नौद
निश्चित होईल याची खात्री आहे.
सांस्कृतिक, स्थापत्य आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे.
कमी वेळेत पारंपरिक साहित्य व तंत्रांचा वापर करून, उत्कृष्ट कारागिरीच्या साहाय्याने पूर्ण झालेला हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार असून, याची जागतिक पातळीवर नोंद व्हावी, यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
या मंदिराच्या सभा मंडपाचे काम पुरातत्व विभागाकडे देण्यात आले आहे. हा सभामंडप इगद्रांच्या साहाय्याने पारंपरिक तंत्रज्ञानातून बनविला जात आहे. या सभामंडपात एकूण ४८ स्तंभअसून, मध्यभागी घुमट तयार करण्यात येणार आहे.
या सभामंडपाचे एकूण क्षेत्र २ हजार ७५० चौरस फूट इतके असेल. यातील स्तंभ दोन ते तीन दगडांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, खंबावर कमनी उभारल्या जाणार आहेत. या कमानीदेखील तीन दगडामध्येच पूर्ण करण्यात येणार आहेत.
त्यावर असलेला घुमट हादेखील तशाच पद्धतीने उभारला जाणार आहे. हा सभा मंडप तयार करण्यासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
वारसा जतन महत्त्वाचे
कंबोडियातील प्राचीन मंदिरांचे
संवर्धन, श्रीलंकेतील ऐतिहासिक स्थळांचे जतन, जपानमधील पारंपरिक लाकडी वास्तु पुनर्बाधणी, रोमन व ग्रीक पुरातत्त्वीय स्थळांचे संवर्धन इटलीतील ऐतिहासिक इमारतींचे पुनरुज्जीवन झाले आहे. भीमाशंकर मंदिर सभामंडपाचे काम २ जानेवारी रोजी सुरू झाले ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दी ष्ट आहे. यासंदर्भात लंडन येशील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार एका सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्या
नियंत्रणाखाली हे काम होईल.