भोकर तालुक्यातील रिठ्ठा येथे तरूणाचा खून

Photo of author

By Sandhya

भोकर तालुक्यातील रिठ्ठा येथे तरूणाचा खून

 तोंडावर व गुप्तांगावर जबर मारहाण करून तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना आज (दि. ६) सकाळी उघडकीस आली. ही घटना भोकर तालुक्यातील रिठ्ठा येथे घडली. माधव दशरथ शकीरगे (वय २४) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, भोकर तालुक्यातील रिठ्ठा येथील माधव शकीरगे हा बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होता. दशरथला आई वडील नसल्याने व त्याचा भाऊ तेलंगणात कामासाठी गेल्यामुळे तो घरी एकटाच राहत होता. शुक्रवारी (दि. ५) रात्री तो घरी असताना अज्ञाताने त्याच्या तोंडावर व गुप्तांगावर जबर मारहाण केली.

यात त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या व गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या आहेत. पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सपोनि अनिल कांबळे, दिगंबर पाटील, एएसआय संभाजी हनवते, नामदेव शिळाळे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास भोकर पोलीस करत आहेत.

Leave a Comment