वाल्मिक कराडला मोठा झटका: २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Photo of author

By Sandhya


बीड: मस्साजोगचे गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर काल मकोका लावण्यात आला. त्यानंतर त्याला आज (१५ जानेवारी) बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. येथे दोन्ही पक्षाकडून मोठा युक्तिवाद करण्यात आला. यावेळी एसआयटीने अधिक तपासासाठी कोर्टाकडे १० कराडची दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायालयाने कराड सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

वाल्मिक कराडला मोठा झटका देत बीड न्यायालयाने सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीकडून १० दिवासांची कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र, सात दिवासांची एसआयटी कोठडी दिली. २२ जानोवारीपर्यंत ही एसआयटी कोठडी असेल. या सात दिवसात एसआयटीला सर्व पुरावे गोळा करावे लागणार आहेत. त्यामुळे हे सात दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

आज बीड न्यायालयात वाल्मिक कराडची सुनावणी झाली. वाल्मिक कराड प्रकरणाची दीड तास सुनावणी सुरु होती. आज कोर्टात एसआयटीने कोर्टात भूमिका मांडली. यावेळी खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा कसा संबंध आहे हे एसआयटीने न्यायालयात मांडलं. तर, वाल्मिक कराडवर लावण्यात आलेल्या ३०२ अंतर्गत गुन्हा हा चुकीचा असून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कराडच्या वकिलाने सांगितलं. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मकोका अंतर्गत जेव्हा कराडवर कारवाई करण्यात आली, या आरोपाखाली आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाल्मिक कराडला फाशी द्या, कोर्टपरिसरात घोषणा

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बीडच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी वाल्मिक कराड कोर्टामधून बाहेर जात असताना घोषणाबाजी केली. आरोपींना फाशी द्या असं म्हणत त्यांनी घोषणा दिल्या आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. शिवसंग्राम संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या देखील या घोषणाबाजीमध्ये सहभागी होत्या.
वाल्मिक कराड समर्थक आक्रमक

वोल्मिक कराड कोर्टाबाहेर जात असताना त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे वापस घ्या आणि पोलिसांची दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, अशा देखील घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकरणानंतर कोर्ट परिसरातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आक्रमक झालेल्या समर्थकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Leave a Comment