BIG NEWS : आजपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ…

Photo of author

By Sandhya

आजपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ

नवीन महिना सुरु झालं कि देशात काही बदल होत असतातच. त्यानुसार या महिन्यातही  सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण  LPG सिलेंडरच्या दरात वाढ करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलंय. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही वाढ आजपासून करणार असल्याची घोषणा केलीय.

दरम्यान, ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी करण्यात आलीय. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ केलीय.

विविध शहरांमध्ये आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी महागली आहे. तर 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही सलग दुसरी वाढ आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दोनदा वाढ करण्यात आली आहे.

मोठ्या शहरातील LPG सिलिंडरचे नवीन दर   दरम्यान, या वाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,795.00 रुपये झाली आहे. यापूर्वी ती 1,769.50 रुपयांना उपलब्ध होते. अशाप्रकारे दिल्लीतील किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे.

मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1723.50 रुपयांवरुन 1749 रुपयांवर पोहोचलीय. आता हा सिलेंडर कोलकातामध्ये 1911 रुपयांना मिळणार आहे. जो पूर्वी 1887 रुपयांना मिळत होता. चार मोठ्या शहरांमध्ये चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर सर्वात महाग आहेत. चेन्नईतील किंमत आता 1937 रुपयांवरुन 1960.50 रुपये झाली आहे.

सर्वात मोठी वाढ ही दिल्ली आणि मुंबईमध्ये झाली. तिथे प्रति सिलेंडरची किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे. कोलकात्यात 24 रुपये आणि चेन्नईमध्ये 23.50 रुपयांची वाढ झालीय.

देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच 14 किलोच्या सिलेंडरबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये शेवटचा बदल 30 ऑगस्ट रोजी झाला होता. म्हणजेच 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 6 महिन्यांपासून स्थिर आहे.

Leave a Comment