
अनुपमा फेम नितेश पांडे या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला आहे. टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. ती ३९ वर्षाची होती.
‘साराभाई वर्सेस साराभाई’मधून प्रसिद्ध झालेली वैभवी उपाध्याय हिचे २२ मे रोजी कार अपघातात मृत्यू झाला होता. ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह नव्हती. पण आपले व्हिडिओज आणि फोटोज वेळोवेळी अपडेट करत होती. जर तिच्या शेवटच्या पोस्ट विषयी सांगायचे झाले तर, जे जवळपास १६ दिवस जुनी पोस्ट आहे.
जिथे ती पर्वत आणि निसर्ग, नदीच्या किनारी दिलसते. तिची मोठी पोस्टही दिसते. कसा झाला अपघात? खरंतर वैभवी उपाध्यायचा हा अपघात हिमाचल प्रदेशमध्ये झाला. एका रस्त्याच्या किनारी टर्न घेताना कार दरीत कोसळली.
यावेळी तिच्यासोबत तिचा होणार पतीदेखील होता. पण, त्याच्याबद्दल अद्याप कोणतीही अपडेट मिळालेली नाही. अभिनेत्री वैभवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईत केले जाईल. या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर तिच्या कुटुंबीयांनी दिलीय.