BIG NEWS : खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Photo of author

By Sandhya

मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.  एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषयीची माहिती देत त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली.

शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले.

दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचे वय ४७ होते. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा परिवार आहे.

खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नवी कार खरेदी केली होती. भद्रावती येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या पोटाला व कंबरेच्या भागाला गंभीर दुखापत झाली. मात्र या दुखापतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पोटदुखी वाढल्यानंतर नागपुरात अरिहंत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. या अपघातात स्वादुपिंडाला जबर दुखापत झाली. तीच पुढे गंभीर होत गेली.

खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन बाळू धानोरकरांनी घेतले होते. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाहीत. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचेही निधन झाले. पिता-पुत्र्याच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page