BIG NEWS : कोरोनापेक्षाही घातक विषाणूचा प्रसार; महामारीसाठी जगाने तयार राहावे

Photo of author

By Sandhya

महामारी

पुढील महामारीसाठी जगाने तयार राहावे. ही महामारी कोरोना महामारीपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकते, अशा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख ( WHO chief ) टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिला आहे. वार्षिक आरोग्य संमेलनात ते बोलत होते. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडिपेंडंट’ने दिले आहे.

टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्‍हटलं आहे की, जगासमोर आणखी एक महामारीचे संकट येण्‍याचा धोका आहे. विषाणूचा आणखी एक प्रकार येण्याचा धोका आहे ज्यामुळे रोग आणि मृत्यूमध्‍ये वाढ होईल.

या महामारीसाठी संपूर्ण जगाने तयार राहावे. तसेच व्‍यापक उपाययोजनांची तयारी करावी. WHO chief  : सर्वांनी सामूहिक उत्तर देण्‍यासाठी सज्‍ज असले पाहिजे या पिढीने एक छोटासा विषाणू किती भयानक असू शकतो याचा अनुभव घेतला आहे.

आता पुढील महामारी जगाचे दार ठोठावते आहे. या महामारीला आपण सर्वांनी निर्णायक, सामूहिक आणि न्याय्यपणे उत्तर देण्यासाठी तयार असले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

९ मुख्‍य रोग हे सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका निर्माण करतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे.  उपचारांच्या अभावामुळे किंवा साथीच्या रोगास कारणीभूत ठरण्याच्या क्षमतेमुळे ते सर्वात धोकादायक मानले गेले. मागील तीन वर्षात कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले.

हे शतकातील सर्वात गंभीर आरोग्य संकट मानले गेले. यामध्‍ये जगभरात सुमारे सात दशलक्ष मृत्यूची नोंद झाली आहे. कोविड-19 साथीचा रोग यापुढे आरोग्य आणीबाणी नाही, असे नुकतेच डब्ल्यूएचओने जाहीर केले होते.

Leave a Comment