प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने आपलं जीवन संपवलं आहे. सोमवारी (दि. 2) दुपारी सोमटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅट मध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली.
डेबू राजन खान (वय 27) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू आयटी अभियंता होता. हा शिंदे वस्ती, सोमटणे फाटा येथे एका फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.
दरम्यान, सोमवारी दुपारी घरात डेबूने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील रुग्णालयात हलवला.
अधिक माहिती अशी की, डेबू हा सोमाटणे फाटा येथे एकटाच एका फ्लॅटमध्ये राहत होता. सोमवारी सकाळपासून त्याने घराचे दार उघडले नाही. याबाबत दुपारी घर मालकिणीला शंका आल्याने तिने त्याच्या भावाशी फोनवरून संपर्क साधला.
भावानेही लगेच डेबूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे भावाने सोमटणे फाटा येथे त्याच्या राहत्या घरी येऊन त्याने दार वाजवले. पण डेबूने घराचे दार उघडले नाही. त्यामुळे तळेगाव पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती या घटनेच्या आधी डेबूने एक चिट्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे.
त्या चिट्ठीमध्ये धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचं आणि त्यातून आर्थिक फटका बसल्याचा उल्लेख केला आहे. तसेच ज्यांच्याशी पैशाचे व्यवहार केले आहेत.
त्या लोकांची नावेही त्या चिट्ठीत नमूद केलेले आहेत. याच आधारावर तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह लेखक राजन खान यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहित तळेगाव पोलिसांनी दिली.