काँग्रेस पक्षाने राज्यातील लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून कोणकोणत्या जागा काँग्रेस सक्षमपणे लढऊ शकतो याची चाचपणी करण्यासाठी 2 व 3 जून रोजी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या चर्चेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे मावळ लोकसभा मतदार संघातून चांगली लढत देऊ शकतात या वर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडून घेण्यावर एकमत झाल्याचे कळते.
पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला सोडला गेल्यामुळे काँग्रेस पक्षाने मावळ लोकसभेवर दावा केला आहे.
कारण मावळ लोकसभा मतदार संघात कर्जत- खालापूर, पनवेल, उरण हे विधानसभा मतदार संघ येतात आणि यापूर्वी मावळ लोकसभेची उमेदवारी वरच्या उमेदवाराला दिली होती.
काँग्रेस पक्ष कोकणात मजबूत करायचा असेल तर महेंद्रशेठ घरत यांना उमेदवारी द्यावी अन्यथा उरण, पनवेल, कर्जत मधील मतदारांमध्ये असंतोष पसरेल अशी एकमताने मागणी रायगड मधील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्तानी पक्षश्रेष्टींकडे केली आहे.