BIG NEWS : मुंबई शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

Photo of author

By Sandhya

मुंबई

मुंबई शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना ट्विटरवरून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. एका अनोळखी तरुणाने ट्विटरवर धमकीचा मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये त्याने मुंबईत लवकरच स्फोट घडवणार असल्याचं सांगितलं. मेसेजमध्ये तरुणाने लिहिले आहे की, लवकरच तो मुंबईत स्फोट घडवणार आहे. मुंबई पोलिसांनी आज या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

याप्रकरणी संबंधित खात्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तरुणाची ओळख पटली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment