BIG NEWS : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी

Photo of author

By Sandhya

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपयांचे विशेष नाणे जारी करण्यात आले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशाला नवीन संसद मिळत असल्यामुळे 75 रुपयांचे नाणे तयार करण्यात आले आहे.

हे विशेष नाणे वर्तुळाकार असून त्याचा व्यास 44 मिलिमीटर इतका आहे. नाणे तयार करण्यासाठी 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल व 5 टक्के झिंक वापरण्यात आले आहे.

नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचे चित्र आहे. त्याच्या खाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले आहे. तर डाव्या बाजूला देवनागरी भाषेत ‘भारत’ तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असे लिहिलेले आहे.

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसद भवन संकुलाचे चित्र आहे. याच्या शेजारी ‘संसद संकुल’ असे देवनागरी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे. या नाण्याचे वजन 33 ग्रॅम इतके आहे.

Leave a Comment