Big News : पुण्यापर्यंत मेट्रोचा मुहूर्त हुकला ?

Photo of author

By Sandhya

मेट्रो

पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो धावायला सुरू होऊन सव्वावर्षे झाले तरी, फुगेवाडीच्या पुढे तसेच, पुण्यापर्यंत मेट्रोची धाव अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या प्रतिसादाअभावी मेट्रो दिवसभर रिकामीच फेर्‍या मारताना दिसत आहे.

पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्टपर्यंत (सत्र न्यायालय) मे महिन्याच्या अखेरीस मेट्रो सुरू करण्याचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळ्यात पिंपरीपासून सिव्हिल कोर्ट, वनाज व रुबी हॉल या तीन मार्गावर मेट्रो सुरू होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतर मेट्रो धावत आहे.

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत 6 मार्च 2022 ला मेट्रो सुरू करण्यात आली. अर्धवट मार्गावर मेट्रो सुरू झाली. त्यानंतर फुगेवाडीच्या पुढे तसेच, पुणे शहरापर्यंत मेट्रो धावत नसल्याने नागरिकांचा प्रतिसाद नाही.

प्रवाशांविनाच मेट्रो दिवसभर रिकामीच धावताना दिसत आहे. सव्वावर्ष झाले तरी, अद्याप मेट्रो एक स्टेशनही पुढे सरकलेली नसल्याने आणि पुणे शहरासोबत जोडली न गेल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment