राज्यातील पुण्यात देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारण्यात येणार असून, या भवनमध्ये पहिले ऑलिम्पिझम ही उभारले जाणार आहे.
त्यासाठीची क्रीडा विभाागाच्या वतीने वेगाने हालचाली झाल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्तावही सादर केल्याची माहिती क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारले जात आहे. 20 कोटींच्या या इमारतीसाठी शासनाच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडीतील श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल येथील क्रीडा प्रबोधिनीच्या वसतिगृहाजवळील अडीच एकर जागाही मंजूर केली आहे.
याशिवाय शासनाच्या वतीने सुरुवातीला दोन कोटींचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. या भवनमध्ये राज्यातील सर्व संघटनांच्या मुख्य कार्यालयांसह जिम,
क्रीडाविश्वातील पुस्तकांच्या ग्रंथालयासारखे सर्व एकाच ठिकाणी असणारे हे देशातील पहिलेच ऑलिम्पिक भवन ठरणार आहे.