BIG NEWS : साई मंदिरात 2 हजारांच्या नोटांचा स्वीकार

Photo of author

By Sandhya

साई मंदिरात 2 हजारांच्या नोटांचा स्वीकार

केंद्र सरकार व रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशानुसार सध्या चलनात असलेली 2 हजार रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंतच चलनात आहे. यानंतर साई भक्तांनी साई बाबांच्या दक्षिणा पेटित 2 हजारांची नोट दान म्हणून टाकू नये,

असे आवाहन श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सीवा शंकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले. 2016 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चलनातील 500 व 1 हजाराच्या नोटा बंद केल्या.

100, 50, 20, 10 रुपयांची नोट जुनी व नवी नोट बाजारात आणून नोट बंदीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा या भाविकांनी दान म्हणून साई चरणी अर्पण केल्या होत्या.

यावेळी साई संस्थांनकडे मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा होत्या. त्यानंतर नुकतेच रिजर्व बँक इंडिया आणि केंद्र सरकार यांनी सध्या चलनात असलेली 2 हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. ही नोट सध्या (दि. 30 सप्टेंबर 2023) पर्यंतच चलनात वापरता येणार आहे.

त्यामुळे भाविकांनी 30 सप्टेंबरनंतर श्रीसाई चरणी दान म्हणून 2 हजार रुपयांची नोट देऊ नये, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सीवा शंकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे,

मात्र ज्या नोटा चलनात आहेत, त्या स्वीकारहार्य आहे. याबरोबरच भाविकांना ऑनलाईन पेमेंट सुविधा, डीडी, मनी ऑर्डर अशा रितीचे देय प्रक्रिया कार्यान्वित आहे, मात्र असे तरी 2 हजारांची नोट साई चरणी दान म्हणून दि. 30 सप्टेंबर पर्यंत चालू शकणार आहे.

Leave a Comment