BIG NEWS : शिंदे गटाच्या महिला आमदाराच्या गाडीला अपघात

Photo of author

By Sandhya

अपघात

शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या वाहनाला जळगावच्या करंज गावाजवळ भीषण अपघात झाला.

यात ते किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असताना जळगाव तालुक्यातील करंज गावाजवळ काल रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

त्यांच्या कारला एमएच 19- झेड 6245 क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात कारचे नुकसान झाले असून सोनवणे दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

Leave a Comment