सर्वात मोठी बातमी, संजय राऊतांना कॅन्सरचं निदान, स्वत: मुलाखतीत दिली मोठी माहिती

Photo of author

By Sandhya

Biggest news, Sanjay Raut diagnosed with cancer, he himself gave big information in an interview

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग खासदार संजय राऊत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत त्यांना गंभीर आजाराचं निदान झालं होतं. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. आपल्याला फार गंभीर आजाराचं लागण झाल्याची माहिती स्वत: खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली होती. पण संजय राऊत यांना नेमकं कोणत्या आजाराने ग्रासले आहे? याची माहिती समोर आली नव्हती. त्यांच्या कार्यकर्ते, चाहत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंतेची लाट पसरली होती. पण हार मानतील ते राऊत कुठे? संजय राऊत यांनी या आजारावर बऱ्यापैकी मात मिळवत पुन्हा कमबॅक केलं. संजय राऊत यांनी आता स्वत: आपल्याला झालेल्या आजाराची माहिती दिली आहे.

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांच्यावर रुग्णालयात काही दिवस उपचार देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर संजय राऊत यांचा चेहऱ्यावर मास्क असलेला फोटो समोर आला होता. पण संजय राऊत यांना नेमकं कोणत्या आजाराने ग्रासलं आहे? ते सर्वसामान्य जनतेला माहिती नव्हतं. पण आता स्वत: संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजारपणावर भाष्य केलं आहे. अनेकांना ज्या आजाराची शंका होती त्याच आजाराचं निदान संजय राऊत यांना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय राऊत यांनी सविस्तर याबाबत माहिती दिली.
संजय राऊत यांनी मुलाखतीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांवर सडकून टीका केली. यावेळी संजय राऊत यांना राजकारण वगळता वैयक्तिक आयुष्यातील लढाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली.

“नाही, मला कॅन्सर झाला ना? त्यात काय? दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कॅन्सरचं निदान झालं. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माझं रक्त चेक केलं. त्यातून ते निष्पन्न झालं की, मला पोटात कॅन्सर आहे. त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतोय. मला जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा मी बाहेर आलो. उभा राहिलो. अजून काही उपचार सुरु आहेत. काही सर्जरी व्हायच्या आहेत. पण त्या होतील. एवढ्या सर्जरी आपणही करतो. हे आपल्या शरीरातील सर्जरी आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page