बिहारमध्ये ट्रक आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

Photo of author

By Sandhya

बिहारमध्ये ट्रक आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये ट्रक आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बिहारच्या अवरल याठिकाणी  हा भीषण अपघात झाला असून हा अपघात इतका भीषण होता की घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा आणि ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. दोन्हीही वाहने औरंगाबादच्या दिशेने जात असताना पुढे असलेल्या रिक्षामध्ये ५ जण प्रवास करत होते. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा काही अंतरावर फेकली गेली.

अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचे वरचे छत वेगळे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मृत व्यक्तींची ओळख अद्याप पूर्ण पटली नसून ते जगदीशपुर आरा येथील रहिवासी असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. या भीषण अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल तासभर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी यावेळी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.

Leave a Comment