अपघात : बिरोबावाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू..

Photo of author

By Sandhya

बिरोबावाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू..

पाटस-दौंड रस्त्यावरील बिरोबावाडी (ता. दौंड) येथे दुचाकी व चारचाकी वाहनाच्या धडकेत 27 वर्षीय तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त जमावाने चारचाकी गाडी पेटवून दिली आहे.

या अपघात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव नेहाल अप्पासो गावडे (वय 27, रा. बिरोबावाडी, ता. दौंड) असे आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील चारचाकी गाडीचालक अविनाश चंद्रकांत घोलप यांच्यावर यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नेहाल गावडे हा गावातील मंदिरातून देवदर्शन करून घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता. या वेळी दौंडकडून अतिशय वेगात जाणारी चारचाकी (एमएच 02 सीव्ही 4898)ने नेहाल याच्या दुचाकी (एमएच 42 पी 8309)ला जोराची धडक दिली.

यामध्ये नेहालचा जागीच मृत्यू झाला. परिणामी, संतप्त झालेल्या जमावाने दुपारी 12 वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी जाळून टाकली. या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलिस सागर चव्हाण व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

Leave a Comment

You cannot copy content of this page