भाजपचा तीन विद्यमान आमदारांना धक्का…?

Photo of author

By Sandhya

 भाजपचा तीन विद्यमान आमदारांना धक्का

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली होती. लवकरच भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण पहिल्या यादीत नाव न आलेल्या तीन विद्यमान आमदारांना भाजप धक्का देण्याची शक्यता आहे.

सर्व्हे आणि स्थानिक नेतृत्वाचा कौल घेत भाजप पक्ष श्रेष्ठींनी तीन आमदारांचा पत्ता कट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आमदार विदर्भातील आहेत.

कुणाला मिळणार संधी? भाजपची काय रणनिती? एकीकडे तीन विद्यमान आमदारांना धक्का बसण्याची शक्यता आहेच. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवी राठी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. हरीश पिंपळे यांचे तिकीट कापले गेले तर त्या ऐवजी रवी राठी यांचं नाव चर्चेत आहे.

तेच संदीप धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.. त्यांच्या जागेवर माजी आमदार राजू तोडसाम यांना तिकीट मिळणार असल्याचे बोलले जातेय.

तोडसाम यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केल्याने नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. वाशिममध्ये लखन मलिक यांचेही तिकीट कापले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली आहे. भाजपमधून शाम खोडे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment