BJP’s storm in Kavathe-Takali Haji area blooms under the leadership of the Gavde family



शिरूर पुणे: एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कवठे टाकळी हा जिल्हा परिषद गट व कवठेगण आणि टाकळी हाजी जांबुतगन या तीनही गणात ऐनवेळी उमेदवारी नाकारून गावडे कुटुंबीयांच्या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमामिस कंटाळून शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ऐनवेळी कुटुंब व समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपनाही माजी आमदार गावडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचे पुत्र राजेंद्र पोपटराव गावडे यांना ऐनवेळी भाजपची उमेदवारी दिली. सर्वसामान्य जनतेची टाकळी हाजीच्या गावडी कुटुंबीयांची नाळ जोडलेली असताना दांडगा जन संपर्क व या भागाचा केलेला पूर्णपणे काय पालट जागरूक जनतेने पुन्हा एकदा गावडे कुटुंबीयांवर विश्वास दाखवत या जिल्हा परिषद गटामध्ये कमळ फुलवले आहे भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र गावडे विक्रमी 3000 च्या मताधिक्यापुढे निवडून आलेत तर टाकळी जांबुत गणातून भाजपाच्या सुनिता कड तर कवठे मलठणगणातून भारतीय जनता पक्षाच्या कांचन ताई राजेंद्र सांडभोर यादेखील चांगल्या मतदान घेत विजय झाले आहेत आज टाकळी हाजी गावात या विजयाबद्दल एकच जल्लोष करण्यात आला.टाकळी हाजी जिल्हा परिषद गट
राजेंद्र गावडे – भाजप – १३२३१
दामू घोडे – राष्ट्रवादी काँग्रेस – ९८४६
डॉ सुभाष पोकळे – शिवसेना ५०६९
बाळासाहेब डांगे – शिवसेना उबाठा -४६१२
टाकळी हाजी – पंचायत समिती गण
सुनिता कड – भाजप – ७३६७
संगिता दाभाडे – राष्ट्रवादी काँग्रेस – ६२७०
प्रगती निचित- शिवसेना – २०९४
पवित्रा शेलार – शिवसेना उबाठा – ८७०
कवठे येमाई – पंचायत समिती गण
कांचन सांडभोर – भाजप – ६०८३
माधुरी थोरात – शिवसेना – ४९९२
शिल्पा थोरात – राष्ट्रवादी काँग्रेस – २३१७
जयश्री लंघे – शिवसेना उबाठा -३१५९
जिल्हा परिषद गट विजयी – राजेंद्र गावडे – भाजप
कवठे पंचायत समिती गण – कांचन सांडभोर – भाजप
टाकळी हाजी पंचायत समिती गण – सुनिता कड – भाजप विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे