Bold daylight robbery near Fatehshwar Road in Kavathe Yemai: Property worth around five lakhs stolen: The incident of daytime theft created a stir in the area


शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई च्या फत्तेश्वर महादेव मंदीर रोड जवळ वास्तव्यास असणारे शरद सुनील गायकवाड यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत धाडसी चोरी केली आहे. ही घटना बुधवार दि.११ ला दुपारी ११ ते ३ च्या दरम्यान घडली असल्याची माहिती शरद गायकवाड यांनी दिली. चोरट्यांनी घरातील सुटकेस,पेटी उचकट त्यातील सोन्याचे साडेतीन तोळे सोने,चांदीचे दागिने,कागदपत्रे व रोख साडे हजार लांबवीले.या धाडसी चोरीत गायकवाड यांना सुमारे ५ लाख रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश पवार व शिरूर पोलिसांचे पथक काल सायंकाळीच घटनास्थळी दाखल झाले.घटनेची माहिती घेत पंचनामा करण्यात आला असून आज सकाळी ११ च्या दरम्यान श्वान पथक व ठसे तज्ज्ञ घटना स्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली. या दिवसाच घडलेल्या धाडसी चोरीचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिलीप पवार व सहकारी करीत आहेत. विशेष प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे,शिरूर,पुणे