BRAKING NEWS : अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ?

Photo of author

By Sandhya

अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे तर 11 ऑगस्टला शपथविधी होणार असल्याचेही समजते. शिवाय एका इंग्रजी न्यूज पोर्टलने देखील असा दावा केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र घोषित ठरतील. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देतील.

यामुळे आपसूकच राज्य मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे या पोर्टलने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे. अजित पवारांसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.

या दाव्यामुळे अगोदरच अस्वस्थता पसरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तत्पूर्वी, अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते.

पण भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात केला आहे.

अजित पवार मार्च 2022 पासून अमित शहांच्या नियमित संपर्कात होते. शिंदेंच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती, तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment