चांदणी चौकातील पुलाच्या गर्डर उभारणीसाठी 4 ते 15 जुलै या कालावधीत रोज रात्री 12.30 ते पहाटे 3.30 पर्यंत कात्रज ते देहूरोड रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या कामासाठी वाहतूक वळविण्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. बैठकीला पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, एनएचएआयचे संचालक संजय कदम उपस्थित होते.
नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मल्टी एक्सेल वाहनांची वाहतूक 3 तासांसाठी बंद केली जाणार आहे.
ही वाहने मुंबई एक्स्प्रेस-वे, तळेगाव टोल नाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणी थांबवली जातील व सातार्याकडून येणारी वाहने खेड-शिवापूर टोलनाका येथे थांबवली जाणार आहेत.