ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला आहे. एका स्थानकाजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या वेदनादायक अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
त्याचवेळी, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून ते सतत परिस्थितीची माहिती घेत आहेत.