ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडली येथील टाटा स्टीलच्या हॉट रोल्ड कॉइल प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. कारखान्याच्या भट्टीत हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले आहेत. यातील काही लोक गंभीर आहेत. जखमींवर कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर टाटा स्टीलनेही एक निवेदन जारी केले आहे. त्यात कंपनीने म्हटले आहे की, ‘तपासणीचे काम सुरू असताना 13 जून रोजी दुपारी 1 वाजता स्फोटाची घटना घडली.
काही लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तात्काळ प्लांटच्या आवारातील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कटक येथे हलवण्यात आले.
दुर्घटनेच्या वृत्ताने आम्हाला दुःख झाले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत तपास सुरू केला आहे. सर्व आपत्कालीन प्रोटोकॉल सेवा सक्रिय करण्यात आल्या असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे,’ असे सांगण्यात आले आहे.