BREAKING NEWS : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन

Photo of author

By Sandhya

बुलेट ट्रेन

मुंबई-पुणे- हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचा (बुलेट ट्रेन) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचआरसीएल) रेल्वे मंत्रालयालयाला सादर कोला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून कडून तो रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असून त्यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत.

त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. ही ट्रेन ताशी 250 ते 320 या वेगाने धावणार आहे. मुंबई ते हैदराबाद असा सुमारे 711 किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर ही ट्रेन साडेतीन तासांत कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असणार आहेत. या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा अंदाजे खर्च : 14 हजार कोटी रु. एका ट्रेनची प्रवासी क्षमता : 750 भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंग सिस्टिम, तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (यूपीएडीएएस) मुंबई- हैदराबाद मार्गाची लांबी : 711 किमी काही मार्ग इलिव्हेटेड, तर काही भार्ग भुयारी

Leave a Comment