चाळीस ते पन्नास फूट रस्ता खचल्याची घटना ; ४० दुचाकी , १ चारचाकी कोसळल्याचा अंदाज

Photo of author

By Sandhya

चाळीस ते पन्नास फूट रस्ता खचल्याची घटना ; ४० दुचाकी , १ चारचाकी कोसळल्याचा अंदाज

पूर्व द्रुतगती मार्गाला लागूनच चुनाभट्टी येथे रस्ता चाळीस ते पन्नास फूट खोल खचल्‍याची घटना घडली आहे. या खड्ड्यात अंदाजे चाळीस दुचाकी आणि एक मोटरकार ही कोसळली आहे.

चुनाभट्टी, प्रियदर्शनी विभागात वसंतदादा पाटील इंजिनियरिंग कॉलेज समोर राहुल नगर एसआरए प्रकल्प आहे. इथे रौनक ग्रुप विकासकाचे इमारत निर्माणासाठी पायलिंग चे काम काही दिवसांपासून सुरु आहे.

यातच मुंबईत काही दिवसांपासून जोरदार पाऊस ही बरसतो आहे. अशावेळी आज (बुधवार) दि ५ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान या कामाच्या बाजुचा रस्ता हळू हळू खचू लागला.

या ठिकाणी स्थानिकांच्या चाळीस ते पन्नास दुचाकी उभ्या होत्या. तर एक मोटर कार ही उभी होती. या गाड्या बाजूला काढण्याआधीच काही क्षणात हा रस्ता तीस ते चाळीस फूट खोल खाली खचला. त्या रस्त्याच्या सोबत या सगळ्या गाड्या ही त्या खड्ड्यात कोसळल्या.

सुदैवाने ही घटना घडताना सर्व नागरिक सावध झाले आणि इथून दूर झाले म्हणून जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दुचाकी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच शेजारी असलेल्या राहुल नगर एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment