विधानसभा निवडणूक ही कुण्या एका उमेदवाराच्या भाग्याची नसून महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी निश्चित करणारी आहे. यामुळेच महायुती सरकार आणण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तीन घरांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी जनता पुन्हा एकदा भाजपा – महायुतीचे सरकार आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ काटोल आणि मोवाड, सावनेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा-महायुतीचे उमेदवार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या प्रचारार्थ कळमेश्वर आणि हिंगणा विधानसभा क्षेत्राचे भाजपा-महायुती उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारार्थ रायपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सभा घेतल्या.
बावनकुळे यांनी काटोल विधानसभा क्षेत्रात सतरंजी संघटनेने भाजपा उमेदवार चरणसिंग ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती दिली. कळमेश्वर येथील सभेत काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, बँकेत घोटाळा केल्याने त्यांना कोर्टाने शिक्षा दिली. यामुळे त्यांना आता ६ वर्षे निवडणूक लढता येत नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांचा कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, असा आरोप केला.
यानंतर आपल्या कामठी विधानसभा मतदारसंघात देखील बावनकुळे यांनी प्रचार केला उपनगरांचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. मध्यप्रदेशच्या खासदार मायाताई मरोलिया, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार अशोक मानकर, राजेश जीवतोडे, अशोक धोटे, प्रकाश टेकाडे, अविनाश ठाकरे, किरण पांडव, सुबोध मोहिते, उकेश चौहान, राजू हरणे, इस्माईल बारूदवाले,
संतोष पारेख, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, सुरेश खसारे, शामराव बारई, मनोज कोरडे, पार्वतीबाई काळबांडे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, वैशालीताई ठाकूर, विजय महाजन, डॉ. बी. एन. भुतडा, पुरुषोत्तम धोटे, नरेंद्र डोंगरे, मीनाक्षीताई सरोदे, पुष्पाताई चापले, रमजान अन्सारी, रोहित मुसळे यांच्यासह मोठ्या संख्यने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.