चंद्रशेखर बावनकुळे : ’10 दिवसात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार’…

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यात मोठे यश मिळवले होते.

आता विधानसभेच्या निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? ‘काल महायुतीची बैठक झाली, जागा वाटपाबाबत काही चर्चा झाली. पुढच्या दहा दिवसांत १० तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल. पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जागा वाटप जाहीर करतील.

काही जागा वाटपाबाबत आमचं एकमत झालं आहे. आम्ही कुठलीही आकडेवारी मांडली नाही, जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय झाला आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले कि, जागा किती कोणाला मिळाव्या हे महत्त्वाचं नाही. राज्यात आमच्या योजना पुढे नेण्यासाठी महायुतीचं डबल इंजिनचं सरकार हवं आहे.

आमचा जागेसाठी आग्रह नाही तर जिंकण्यासाठी प्राथमिकता आहे. महायुतीला 13 मित्र पक्ष आहेत, जागा वाटपात त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते.

Leave a Comment