राज्यात सत्ता स्थापनेवरून ज्या पद्धतीने विरोधक वावड्या उठवत होते. महाविकास आघाडी नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. पण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेपुढे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विरोधक तोंडावर आपटले, त्यांच्या तोंडाच्या वाफा वाफाच राहिल्या, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
लोकसभा जिंकले, तेव्हा सर्व चांगले, आता पराभूत झाले म्हणून ईव्हीएमवर ते खापर फोडत आहेत. 52 टक्के मतदान आम्हाला तर त्यांना 32 टक्के मते मिळाल्याचा दावा केला. आज एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर भाजपच्या या भूमिकेकडे राज्याचे लक्ष होते. आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचे काम बघितले.
त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावत काम केले. अडीच वर्षात महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून पुढे नेण्यासाठी काम केले. शिंदे यांनी या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार मिळावे, म्हणून काम केले.
मराठा, ओबीसी आरक्षण, विकासाभिमुख काम केले. मोदींच्या नेतृत्वात न भूतो.. जनादेश मिळाला. शिंदे हे रडणारे नव्हे, तर लढणारे नेते आहेत. उद्धव ठाकरे सरकारला लाथ मारून ते बाहेर पडले. राजकारणात नवा आदर्श आज त्यांनी घालून दिला.
केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय उद्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय महायुती, भाजपमध्ये अंतिम असतो. एकनाथ शिंदे यांनी कधीही विरोध केला नाही. आमची लढाई मुख्यमंत्रिपदाची नव्हतीच, काँग्रेसकडे 8 तर शरद पवार यांच्याकडे 3 आणि शिवसेनेत दोन मुख्यमंत्री होते. आमचा जाहीरनामा जनतेने स्वीकारला, आम्हालाच कौल दिला.
महायुती मजबूत केली. केंद्रीय नेतृत्व जो घेईल, तो निर्णय मान्य असेल, असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. उद्या दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत जो निर्णय होईल. तो भाजप व शिवसेनेला मान्य राहील, असे स्पष्ट करीत वारंवार प्रश्न छेडूनही बावनकुळे यांनी मौन बाळगले.