
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरापगड जातींसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महाविजय 2024 मावळ लोकसभा प्रवासानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मावळ दौऱ्यादरम्यान देहूरोड येथे स्वामी विवेकानंद चौकामध्ये आले होते. त्या वेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.
भाजपाचे नवनिर्वाचित देहूरोड शहराध्यक्ष रवींद्र शेलार यांनी पुष्पहार आणि पुणेरी पगडी घालून त्यांचा सन्मान केला. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, प्रचार प्रमुख रवींद्र बिगडे, बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ऍड.
कैलास पानसरे, देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, महावीर बरलोटा, संजय पिंजन, मदन सोनिगरा, रमेश रेड्डी, उमाशंकर सिंह, रघुवीर शेलार, हनीफ शेख, सविता पिंजण, सारिका मुथा, सारिका नाईकनवरे यांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.