‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी तमाशाला कमी जावं’ ; रुपाली पाटील यांचा पलटवार

Photo of author

By Sandhya

‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी तमाशाला कमी जावं’ ; रुपाली पाटील यांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रकरणावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे.  अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना म्हटले होते की,’राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा आहे’ त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

रूपाली पाटील म्हणाल्या, ‘चंद्रशेखर बावनकुळे हे तमाशाला जात असावेत. ज्यांना कावीळ झाली असते त्यांना सर्व पिवळं दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तमाशाला कमी जावं.

भाजपचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, महत्त्वाच्या पदावर असलेल्या लोकांची कामंच करा, तमाशा पाहायला, लोकांची घरं फोडायची. जागे व्हा राज्याची धुरा तुमच्या हातात आहे. राज्याची कामं करा, असे देखील म्हणत रूपाली पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page