छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायप्रियता अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी असून महाराजांच्या याच मूल्यांनूसार अमृत काळातील २५ वर्षांचा प्रवास पूर्ण करायचा आहे. महाराजांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठीचा हा प्रवास असेल.
हा प्रवास स्वराज्य, सुशासन, आत्मनिर्भरतेचा आणि विकसित भारतासाठी असेल, असे शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
”छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी असलेल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना कोटी कोटी वंदन”, अशा मराठीतून शुभेच्छा पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशातून दिल्या.
नवीन चेतना, नव ऊर्जा घेवून येणारा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा दिन एक विशेष अध्याय आहे. या अध्यायातून समोर आलेले स्वराज्य, सुशासन, समृद्धीच्या महान गाथा आजही प्रेरित करतात. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण हे छत्रपतींच्या शासन व्यवस्थेचे मुलतत्व होते, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र आजचा दिवस महोत्सव म्हणून साजरा करीत आहे. वर्षभर अशाप्रकारचे आयोजन राज्यभरात करण्यासाठी यावेळी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. छत्रपतींच्या राज्याभिषेकात स्वराजांचा हुंकार आणि राष्ट्रीयतेची जयजयकार समाविष्ठ आहे. महाराजांनी भारताची एकता आणि अखंडतेला सर्वोतपरी ठेवले.’एक भारत, श्रेष्ठ भारत’ या ‘व्हिजन’मध्ये महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते, असे मोदी म्हणाले.
छत्रपतींच्या कार्यकाळात देशाची स्थिती अत्यंत प्रतिकूल होती.शेकडो वर्षांपासून गुलामी आणि परकीय आक्रमणांनी देशवासियांचा विश्वास हिरावून घेतला होता.आक्रमण आणि गरिबीने समाजाला दुबळ बनवले होते. सांस्कृतिक केंद्रावर आक्रमण करीत लोकांचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या काळात लोकांमधील विश्वास जागृत करण्याचे कार्य अत्यंत कठीण होते. परंतु, महाराजांनी केवळ आक्रमणकर्त्यांवर सामना केला नाही, तर जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. देशवासियांची गुलामगिरीची मानसिकता नष्ट करीत त्यांना राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित केले, अशा शब्दात पंतप्रधानांनी छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला.
महाराजांची आक्रमणकर्त्यांकडून राज्य, संस्कृतीचे संरक्षण करीत राष्ट्रनिर्माण केले. त्यांच्या याच दृष्टिमुळे इतिहासातील इतर नायकांहून ते वेगळे ठरतात. स्वराज्य, धर्म, संस्कृती आणि वारसांना नष्ट करणाऱ्यांना देखील त्यांनी संकेत दिले.
लोकांमध्ये त्यामुळे दृढ विश्वास वाढून आत्मनिर्भरतेची भावना बळावली. राष्ट्रकल्याण, महिला सशक्तीकरण, शासन-प्रशासनाचे त्यांचे कार्य, शासन प्रणाली आणि धोरण आजही प्रासंगिक आहे. नौसेनेतील महाराजांचे कौशल्य त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंपैकी एक आहे.
छत्रपतींच्या प्रेरणेने गतवर्षी भारताने गुलामगिरीच्या चिन्हातून नौदलाला मुक्त केले. नौदलाच्या ध्वजावर महाराजांशी प्रेरित राजमुद्रेला स्थान देण्यात आले. हाच ध्वज नवीन भारताचा अभिमान आहे.