मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : लाडक्या बहिणींनो, सावत्र भावांपासून सावध राहा…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध राहा. कारण विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. हे पाप का करताय? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री शिंदे सांगलीतील विटा येथील टेंभू योजनेच्या ६व्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी एका शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी काम करण्याच्या शैलीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. आमच्या सरकारने वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा योजना करणारे आमचे पाहिले सरकार आहे. कारण आम्ही गरिबी पहिली आहे. कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी योजना सुरू केली. घरात बसून कामे होत नाहीत, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील आपल्या शेतावर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात त्यावरूनही शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलं. हेलिकॉप्टरने शेतीला जातो, अशी माझ्यावर टीका केली जाते, पण मला वेळेचे बंधन आहे. मी १ तासात १० हजार सह्या करतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवरून हल्लाबोल राज्य सरकारची लाडकी बहिणी योजना खूप लोकप्रिय ठरलीय. या योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी नेहमी आमनेसामने आलेत. महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये सरकार जमा करत असते, मात्र ही योजना फसवी असून फक्त निवडणुकांसाठी रावबण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो.

याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लाडक्या बहिणींनो, सावत्र भावापासून सावध राहा. कारण विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. हे पाप का करताय, असा सवालही त्यांनी केला.

Leave a Comment